अरे तू कुठे आहेस, आपली छकुली तापाने फणफणत आहे. बायको फोन वर काळजीत म्हणाली. अग मी….एक्दम काय बोलायचं सुचत नव्हत पण तरी कसेतरी उत्तर दिले, की मिटिंग आटोपली आहे आणि खंडाळा जवळ चहा हा थांबलोय. मी येतोच होईल तेवढ्या लवकर. अरे, डॉक्टर येऊन गेले आहेत मगाशी. औषध दिले आहे त्यांनी त्यामुळे तू जास्त टेन्शन नको घेऊस. Ok बोलून मी फोन ठेवला आणि तिला सांगितले की बायकोचा फोन होता, माझ्या मुलीला खूप ताप आहे, आपण लगेच परत निघुया. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे बांधून ती “OK. Fine” येवढे बोलली. जाताना ज्या आनंदात आम्ही गेलो होतो त्याची अगदी विरुद्ध Situation होती आता. दोघेही एकदम गप्प , मी होईल तेवढ्या Speed ने Car Drive करत होतो. थोड्या वेळाने ती Car मध्ये झोपून गेली आणि मी छकुली ची आठवण काढत होईल तेवढ्या लवकर घरी पोचण्याचा प्रयत्न करत होतो. 2 एक तासाने आम्ही मुंबईत पोचलो. नेहमीच्या ठिकाणी गाडी थांबवली.ती ही थोडयावेळापूर्वी झोपून उठली होती. मी तिला “Sorry, मला घाईत निघायला लागतंय असे बोललो. ती बोलली “It’s OK I can Understand”. “I will Message you at Night” असे बोलून मी कार स्टार्ट केली. तिला Bye करण्याचे पण माझ्या ध्यानात नाही राहिले.
धावत-पळत घरी आलो आणि दरवाजाची Bell वाजवली. बायकोने दरवाजा Open केला आणि समोरच Bed वर छकुली शांत झोपली होती. मी धावून तिला सरळ कडेवर घेतले आणि तिला धरून अक्षरशः रडू लागलो. हे पाहून बायको म्हणाली अरे Relax, बरी आहे ती आता. उतरतोय ताप. मला माहित आहे तुझे छकुली वर किती प्रेम आहे ते पण तूच असा तिच्या समोर रडलास तर कसे वाटेल तिला ?? Actually, माझे अश्रू हे दोन्ही गोष्टींचे Combination होते.छकुलीला आलेला ताप आणि तिच्या बरोबर कार मध्ये जे घडले असते त्याची आठवण. स्वतःला सावरून मी छकुली ला Bed वर ठेवले. ती पण मला पाहून एक्दम खुशीत आली. शेवटी बाबा आणि मुलीत एक वेगळेच नात असते.अरे Now Relax, तिचा ताप उतरला आहे आता. डॉक्टर म्हणाले औषद घेतल्यानंतर 2 तासात ताप पुन्हा नाही आला तर Nothing To Worry. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. रात्री जेवता जेवता बायको म्हणाली, कसले टेन्शन नाही ना रे आणि काही असेल तर मला सांग. मी बोललो काही नाही ग, छकुली ला काय झाले की तुला माहीत आहे ना मी कसा React करतो. जीव आहे ग ती माझा. हे ऐकून ती बोलली की “Dont Worry, जेव आणि शांत झोप”. रात्री तिचा Good Night चा मेसेज आला आणि मी Reply दिला. बाकी त्या रात्री आमच्यात जास्त बोलणे झाले नाही.
छकुली चा ताप उतरल्यामुळे मी जरा Relax झालो पण काही क्षणातच मला तिच्या बरोबर खंडाळा इथे घडलेला प्रसंग आठवला. बायकोचा फोन आला नसता त्या क्षणी तर काय माहीत काय झालं असते पुढे आमच्यात. या पुढे या सगळ्याबद्दल विचार करायला लागेल. ती लहान आहे, Innocent आहे त्यामुळे मलाच तिला आता सांगावे लागेल की आपल्यात जे काही चाललाय ते बरोबर नाही आहे. तिला एकदा भेटींन निवांत आणि सगळे सांगून टाकीन. अचानक मला आठवले की तिला Gold Ring घेतली होती Birthday Gift म्हणून ती तिला दिलीच नाही आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवारी आमच्यात नेहमीसारख Interaction झाले. मंगळवारी रात्री तिला मेसेज केला की आपण बुधवार Evening माझ्या ऑफिस च्या जवळ Mall आहे तिथे भेटूया. ती लगेच “हो” म्हणाली. बुधवारी तिचा क्लास नव्हता तेव्हा आम्ही Direct संध्याकाळी 6 ला Mall मध्ये भेटलो.आम्ही भेटल्यावर ती मला बोलली मला एक ड्रेस Purchase करायचा आहे, आपण आधी 2nd Floor ला जाऊ मी ड्रेस घेते आणि मग आरामात Coffee Shop मध्ये बसू. आम्ही 2nd Floor ला गेलो, तिने Dress घेतला आणि आम्ही खाली यायला निघालो. 2nd Floor ची Lobby मोठी असल्याकारणे , Escalator पर्यँत जरा Distance होता. आम्ही दोघे Lobby मधून चालत असताना तिने माझा हात तिच्या हातात धरला. मी काही बोललो नाही, शांतपणे चालत राहिलो. आम्ही अजून थोडे पुढे गेलो तोच तिने चालता चालता तिचे डोके माझ्या Shoulder वर ठेवले. मला कळत नव्हतं काय बोलावे. मी काही React होणार त्याच्या आत आमच्या दोघांसमोर मला माझी बायको, छकुली ला कडेवर घेऊन उभी असलेली दिसली.
Leave a Reply